जप करितां राग – संत तुकाराम अभंग – 267

जप करितां राग – संत तुकाराम अभंग – 267


जप करितां राग ।
आला जवळी तो मांग ॥१॥
नको भोंवतालें जगीं ।
पाहों जवळी राख अंगीं ॥ध्रु.॥
कुड्याची संगती ।
सदा भोजन पंगती ॥२॥
तुका म्हणे ब्रम्ह ।
साधी विरहित कर्म ॥३॥

अर्थ
हरी भजन करताना राग आला तर समजावे आपल्याजवळ अस्पृश्य असा मांगच आलेला आहे त्यामुळे देवाचे जप करताना कधीही राग येऊ देऊ नये.अरे तू या भोवतालच्या लोकांचे वर्तन पाहू नकोस आणि तुझ्या अंतःकरणामध्ये जो राग राहतो त्याला तुला स्पर्शही होऊ देऊ नकोस.राग रूप जो मांग आहे तू त्याच्या पंगतीत बसून भोजन करू नकोस.तुकाराम महाराज म्हणतात अरे तू कर्म अकर्म बाजूला ठेव आणि खर्‍या ब्रह्माची प्राप्ती करून घे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


जप करितां राग – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.