भुंकती तीं द्यावीं भुंकों – संत तुकाराम अभंग – 266

भुंकती तीं द्यावीं भुंकों – संत तुकाराम अभंग – 266


भुंकती तीं द्यावीं भुंकों ।
आपण त्यांचें नये शिकों ॥१॥
भाविकांनीं दुर्जनाचें ।
कांहीं मानूं नये साचें ॥ध्रु.॥
होईल तैसें बळ ।
फजीत करावे ते खळ ॥२॥
तुका म्हणे त्यांचें ।
पाप नाहीं ताडणाचें ॥३॥

अर्थ
काही दुर्जन लोक असे असतात की ते कुत्र्यासारखे सारखे भुंकत असतात त्यांना भुंकू द्यावे व त्यांचे काहीही बोलण्या पण मनाला लावून घेऊ नये.भाविकांनी दुर्जनांचे कोणतेही बोलणे मनावर घेऊ नये.अशा खळांची आपल्या बलाने जितकी फजित करता येईल तितकी करावे.तुकाराम महाराज म्हणतात या दुर्जनांना आपण ताडण केले म्हणजे कठोर शिक्षा दिली तरीही आपल्याला पाप लागत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


भुंकती तीं द्यावीं भुंकों – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.