पोटाचे ते नट पाहों नये छंद – संत तुकाराम अभंग – 265

पोटाचे ते नट पाहों नये छंद – संत तुकाराम अभंग – 265


पोटाचे ते नट पाहों नये छंद ।
विषयांचे भेद विषयरूप ॥१॥
अर्थी परमार्थ कैसा घडों सके ।
चित्त लोभी भीके सोंग वांयां ॥ध्रु.॥
देवाचीं चरित्रें दाखविती लीळा ।
लाघवाच्या कळा मोहावया ॥२॥
तुका म्हणे चित्तीं राहे अभिळास ।
दोघां नरकवास सारिखाचि ॥३॥

अर्थ
नाटकामध्ये लोक स्त्री किंवा पुरूष या पात्राची सोंग घेतात परंतु ते विषय असून विषयाचेच प्रकार आहेत त्यामुळे ते पाहू नये.पैसे कमावण्याकरता धन कमविण्याकरता जर परमार्थ केला जात असेल तर मग तो परमार्थ कसा होऊ शकेल आणि नट धनाच्या लोभाने देवाचे सोंग घेत असेल तर ते व्यर्थच आहे.कथेमध्ये हे असे लोक देवाने लीला कसे केले हे दाखवण्या करिता लोकांना मोहित करण्याकरता सोंग धारण करतात पण त्यांचे ते चातुर्य व्यर्थ असते.तुकाराम महाराज म्हणतात चित्तामध्ये पैसे अभिलाषा ठेवून कथा सांगणारे आणि पैसे देऊन ती पहाणारे दोघेही नरकवासाच भोगतात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


पोटाचे ते नट पाहों नये छंद – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.