अतिवाद लावी – संत तुकाराम अभंग – 264
अतिवाद लावी ।
एक बोट सोंग दावी ॥१॥
त्याचा बहुरूपी नट ।
नव्हे वैष्णव तो चाट ॥ध्रु.॥
प्रतिपादी वाळी ।
एक पुजी एका छळी ॥२॥
तुका म्हणे नाहीं ।
भूतदया ज्याचे ठायीं ॥३॥
अर्थ
काही लोक कपाळाला गोपीचंदन लावतात आणि ते स्वतः वैष्णव आहेत असे सोंग आणत असतात,त्याचा वेष हा बहुरूपी नटाप्रमाणे असतो कारण तो खरा वैष्णव नसून खोटारडा असतो. तो एकचि स्तुती करतो तर दुसऱ्याचा तिरस्कार करतो एकाची पूजा करतो तर दुसऱ्याला छळतो.तुकाराम महाराज म्हणतात भूतदया ज्याच्या ठिकाणी असते तोच खरा वैष्णव आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
अतिवाद लावी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.