म्हणविती ऐसे आइकतों – संत तुकाराम अभंग – 263

म्हणविती ऐसे आइकतों – संत तुकाराम अभंग – 263


म्हणविती ऐसे आइकतों संत ।
न देखीजे होत डोळां कोणीं ॥१॥
ऐसियांचा कोण मानितें विश्वास ।
निवडे तो रस घाईडाई ॥ध्रु.॥
पर्जन्याचे काळीं वोहाळाचे नद ।
ओसरतां बुंद न थारेचि ॥२॥
हिऱ्याऐशा गारा दिसती दूरोन ।
तुका म्हणे घन न भेटे तों ॥३॥

अर्थ
असे कित्येक लोक आहेत की जे स्वतःला दुसऱ्याकडून त्यांना स्वतःला संत म्हणवून घेतात परंतु मी माझ्या डोळ्यांनी आज पर्यंत असे संत पाहिले नाही. अशांचा कोण विश्‍वास ठेवतो जगाच्या सुखदुःखांमध्ये घावाडवा मध्ये ज्याची शांती ढळत नाही तोच खरा संत ओळखला जातो. जसे पर्जन्य कालामध्ये एखाद्या ओहोळांमध्ये नदीप्रमाणे पाणी वाहते म्हणजे ते ओहळ नदी आहे काय तर नाही पर्जन्य संपले की त्या ओहाळा मध्येही थेंब पाणी सुद्धा राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात गारगोटीला दुरून जर पाहिले तर अगदी हिर्‍याप्रमाणे दिसते परंतु कुठपर्यंत दिसते तर जोपर्यंत त्याची आणि घनाची भेट होत नाही तोपर्यंत म्हणजे कठीण प्रसंगी संत कोणते खरे आहेत हे लक्षात येते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


म्हणविती ऐसे आइकतों – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.