करिसी तें देवा करीं माझें सुखें ।
परी मी त्यासी मुखें न म्हणें संत ॥१॥
जया राज्य द्रव्य करणें उपार्जना ।
वश दंभमाना इच्छे जाले ॥ध्रु.॥
जगदेव परी निवडीन निराळे ।
ज्ञानाचे आंधळे भारवाही ॥२॥
तुका म्हणे भय न धरीं मानसीं ।
ऐसियाचे विशीं करितां दंड ॥३॥
अर्थ
हे देवा तुला माझे काय करायचे असेल ते कर पण माझ्या मुखाने मी त्यांना संत म्हणणार नाही.जे लोक राज्य द्रव्य इत्यादीं विषयी हाव धरतात इत्यादी विषयी मिळावेत यासाठी प्रयत्न करतात आणि जे लोकं दांभिक आहेत त्यांना आपल्याला लोकांमध्ये मान सन्मान मिळावा असे वाटते अशा लोकांना मी संत म्हणणार नाही.देव जरी सर्व जगामध्ये भरलेला आहे असे असेल तरीदेखील सुद्धा मी अशा लोकांना निवडून वेगळेच काढिन कारण हे लोक यांना ब्रम्हज्ञानाचा काहीही अनुभव नाही तरी फक्त शब्द ज्ञानाचे भार वाहणारे आहेत.तुकाराम महाराज म्हणतात अशा दांभिक लोकांना दंड करण्याविषयी मी माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे भय धरणार नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.