पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान ।
विलास मिष्टान्न करूनियां ॥१॥
शरीर रक्षावें हा धर्म बोलती ।
काय असे हातीं तयाचिया ॥ध्रु.॥
क्षणभंगुर हें जाय न कळतां ।
ग्रास गिळि सत्ता नाहीं हातीं ॥२॥
कर्वतिलीं देहें कापियेलें मांस ।
गेले वनवासा शुकादिक ॥३॥
तुका म्हणे राज्य करितां जनक ।
अग्नीमाजी एक पाव जळे ॥४॥
अर्थ
चांगले गोड-धोड अन्न खाऊन हे शरीर पुष्ट बनवावे असे तत्त्वज्ञान, अधम लोकांचे असते. शरीर रक्षण करावे हे असे त्यांचे म्हणणे असते परंतु शरीराचे रक्षण करणे हे त्यांच्या हातात असते काय? हे शरीर क्षणातच लय पावेल आणि हातात आपण घेतलेला घास गिळू असेसुद्धा आपण म्हणु शकत नाही कारण तेवढी सत्ता ही आपल्या हातात नाही. असे महान मुनि आहेत की ज्यांनी या देवा करतात आपल्या शरीरावर करवत चालविले आहे उदाहरणार्थ (शिबी राजा) आणि शुकमुनि तर या देहाविषयी उदास होऊन वनात राहण्यास गेले. तुकाराम महाराज म्हणतात जनक राजा राज्य करत असताना त्याचा एक पाय अग्नीत जळत होता परंतु त्याचा त्याच्या शरीराकडे लक्ष देखील नव्हते इतका तो हरिचिंतनात रममाण झालेला होता.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.