आलिंगनें घडे – संत तुकाराम अभंग – 26
आलिंगनें घडे ।
मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥
ऐसा संताचा महिमा ।
जाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥
तीर्थे पर्वकाळ ।
अवघीं पायांपें सकळ ॥२॥
तुका म्हणे देवा ।
त्यांची केली पावे सेवा ॥३॥
अर्थ
संतांच्या अलिंगनाने, सहवासाने सायुज्य मोक्षाची प्राप्ति होते .अश्या संतसहवासाचा महिमा शब्दातून वर्णन करतांना शब्द अपुरे पडतात .संतांच्या पायाशी सर्व तीर्थ व पर्वकाळ एकवटलेले असतात .तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच संतचरणांची सेवा करावी .
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आलिंगनें घडे – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.