न मिळो खावया न वाढो संतान – संत तुकाराम अभंग – 259

न मिळो खावया न वाढो संतान – संत तुकाराम अभंग – 259


न मिळो खावया न वाढो संतान ।
परि हा नारायण कृपा करो ॥१॥
ऐसी माझी वाचा मज उपदेशी ।
आणीक लोकांसी हेचि सांगे ॥ध्रु.॥
विटंबो शरीर होत कां विपत्ती ।
परि राहो चित्तीं नारायण ॥२॥
तुका म्हणे नासिवंत हें सकळ ।
आठवे गोपाळ तेचि हित ॥३॥

अर्थ
मला खायला नाही मिळाले तरी चालेल, पोटी संतान नाही झाले तरी चालेल परंतु नारायणाने माझ्यावर सतत कृपा करत राहावी. असाच उपदेश सतत माझी वाणी मला करत असते व लोकांना देखील हेच सांगत असते. माझ्या शरीराची कितीही विटंबना होवाे किंवा माझ्यावर कशीही विपत्ती येवाे तरी चालेल परंतु माझ्या चित्तामध्ये सतत नारायणच रहावे. तुकाराम महाराज म्हणतात अरे हे सर्वकाही नाशवंत आहे त्यामुळे तो सतत गोपाळाची चिंतन करत राहा यातच तुझे हित आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


न मिळो खावया न वाढो संतान – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.