आणीक या काळें न चले – संत तुकाराम अभंग – 258

आणीक या काळें न चले – संत तुकाराम अभंग – 258


आणीक या काळें न चले उपाय ।
धरावे ते पाय विठोबाचे ॥१॥
अवघेचि पुण्य असे तया पोटीं ।
अवघिया तुटी होय पापा ॥ध्रु.॥
अवघें मोकळें अवघिया काळें ।
उद्धरती कुळें नरनारी ॥२॥
काळ वेळ नाहीं गर्भवासदुःखें ।
उच्चारितां मुखें नाम एक ॥३॥
तुका म्हणे कांहीं न लगे सांडावें ।
सांगतसें भावें घेती तयां ॥४॥

अर्थ
या कलियुगामध्ये जर आपल्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर दुसरा कोणताही उपाय चालत नाही फक्त एक विठोबाचे पाय चित्तात साठवून ठेवावे.या जगतामध्ये जे काही पुण्य आहे ते सर्व या विठ्ठलाच्या पायामध्ये चरणांमध्ये आहे आणि त्याच्यानाम चिंतनाने च पापाचा नाश होतो.या विठोबाचे नामचिंतन कोणत्याही काळात करता येते आणि जे कोणी नरनारी या विठोबाचे नाम चिंतन करतात त्यांची सर्व कुळे उद्धरली जातात. या विठोबाचे नाम चिंतन करण्यासाठी कोणताही वेळकाळ पाहण्याची गरज नसते पहावा लागत नाही विठोबाचे नाम एकदा जरी घेतले तरी गर्भवासादि दुखे नाहीशी होतात.तुकाराम महाराज म्हणतात हे हरिनाम घेण्याकरता कशाचाही त्याग करायचा नाही आणि जे हरीचे नाम अगदी श्रध्देने घेतात त्यांनाच मी या हरिनामाचे महत्व सांगतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


आणीक या काळें न चले – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.