काळें खादला हा अवघा – संत तुकाराम अभंग – 257
काळें खादला हा अवघा आकार ।
उत्पत्ती संहार घडामोडी ॥१॥
बीज तो अंकुर आच्छादिला पोटीं ।
अनंता सेवटीं एकाचिया ॥२॥
तुका म्हणे शब्दें व्यापिलें आकाश ।
गुढार हें तैसें कळों नये ॥३॥
अर्थ
या जगाचा आकार काळाने खाल्लेला आहे त्यामुळे कधी प्रलय तर कधी उत्पत्ती हे चालू असतात. ज्याप्रमाणे बीजापासून अंकुराची उत्पत्ती होते आणि पुन्हा ते अंकुर बिजामाध्येच लय पावते त्याप्रमाणे या जगताचा निर्माता, तो हरी आहे व हे जगही त्याच्यातच सामावले जाते. तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे आकाशामध्ये सर्व शब्दच व्यापलेले आहेत हे गूढार म्हणजे रहस्य कसे बरे कळत नाही? (शब्द म्हणजे नाम आहे आणि हे नामच सर्व आकाशात व्यापून उरलेले आहे व त्याच्या साह्याने हरीची प्राप्ती होते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
काळें खादला हा अवघा – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.