संसार तीहीं केला पाठमोरा ।
नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥१॥
शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं ।
जनार्दन जगीं होउनि ठेला ॥२॥
तुका म्हणे देहें दिला एकसरें ।
जयासि दुसरें नाहीं मग ॥३॥
अर्थ
ज्याच्या चित्तात मनात द्रव्य संसार नसतो त्याने संसाराला पाठीमागे टाकले समजावे.चांगल्या वाईट गोष्टी शुभ अशुभ या विषयी आंनद खेद ज्याच्या मनात नसतो तो या जगात जनार्धन रूप होऊन राहिलेला असतो.तुकाराम महाराज म्हणतात आपला देह देवाला अर्पण केला त्याला या जगाशी काहीही कर्तव्य नसते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.