बोलों अबोलणें मरोनियां जिणें – संत तुकाराम अभंग – 253

बोलों अबोलणें मरोनियां जिणें – संत तुकाराम अभंग – 253


बोलों अबोलणें मरोनियां जिणें ।
असोनि नसणें जने आम्हां ॥१॥
भोगीं त्याग जाला संगींच असंग ।
तोडियेले लाग माग दोन्ही ॥२॥
तुका म्हणे नव्हें दिसतों मी तैसा ।
पुसणें तें पुसा पांडुरंगा ॥३॥

अर्थ
आम्ही बोललो तरी आम्हीं अबोलण्या सारखे आहे देह बुद्धीने जरी मेलो असलो पण आत्म बुद्धीने जिवंत आहोत.व देह भाव नष्ट झाला म्हणजे मी मेलो असलो तरी आत्म रूपाने जिवंत आहे.आम्ही विषय भोगाचा त्याग केला आहे आमच्या भोवताली जरी सर्वांचा संग असला तरी आम्हीं असंग आहोत.आहो देह बुद्धीने जरी संसारात असलो तरी माझा आत्मा असंग आहे संगा मध्ये गुंतवणारी जी देह बुद्धी आहे ती आम्ही उरू दिली नाही.तुकाराम महाराज म्हणतात हे जन हो मी तुम्हाला ज्या प्रमाणे दिसतो तसा मी नाही आणि तुम्हाला जाणवायचे असेल तर तुम्हीं त्या हरीला विचारा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


बोलों अबोलणें मरोनियां जिणें – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.