आतां येणेंविण नाहीं मज चाड – संत तुकाराम अभंग – 252

आतां येणेंविण नाहीं मज चाड – संत तुकाराम अभंग – 252


आतां येणेंविण नाहीं मज चाड ।
कोण बडबड करील वांयां ॥१॥
सुख तेंचि दुःख पुण्यपाप खरें ।
हें तों आम्हां बरें कळों आलें ॥ध्रु.॥
तुका म्हणे वाचा वाहिली अनंता ।
बोलायाचें आतां काम नाहीं ॥३॥

अर्थ
तुझे नाम घेणे या व्यतिरिक्त मला काहीही आवडत नाही उगाच व्यर्थ बडबड कोण करील.संसारातील जे सुख आहे खरे तर ते दुखच आणि जे आपण पुण्य म्हणतो ते नश्वर असल्यामुळे ते पापच होय कारण ते बंधन कारक असते हे आम्हला चांगले कळून आले आहे.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तर आमची वाचा हि अनंताला वाहिली आहे त्यामुळे आणिक काही बोलायचे कामच उरले नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


आतां येणेंविण नाहीं मज चाड – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.