देखोनियां तुझा सगुण आकार ।
उभा कटीं कर ठेवूनियां ॥१॥
तेणें माझ्या चित्ता झाले समाधान ।
वाटतें चरण न सोडावे ॥ध्रु.॥
मुखें गातों गीत वाजवितों टाळी ।
नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥२॥
तुका म्हणे केले तुझ्या नामापुढें ।
तुच्छ हें बापुडें सकळही ॥३॥
अर्थ
हे विठ्ठला तुझा सगुण आकार जो कर कटेवर ठेऊन विटे वर उभा आहे ते रूप पाहून माझ्या चित्ताला समाधान झाले आहे असे वाटते कि तुझे चरण कधीच सोडू नये.मी मुखाने तुझे गुणगान गात हाताने ताळी वाजवीत प्रेम सुखाने नाचतो.तुकाराम महाराज म्हणतात अरे विठ्ठला तुझ्या नामाच्या पुढे मला सर्व तुच्छ वाटते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.