काय सांगों तुझ्या चरणीच्या – संत तुकाराम अभंग – 250

काय सांगों तुझ्या चरणीच्या – संत तुकाराम अभंग – 250


काय सांगों तुझ्या चरणीच्या सुखा ।
अनुभव ठाउका नाहीं तुज ॥१॥
बोलतां हें वाटे कैसें खरेपण ।
अमृताचे गुण अमृतासी ॥ध्रु.॥
आम्ही एकएका ग्वाही मायपुतें ।
जाणों तें निरुतें सुख दोघें ॥२॥
तुका म्हणे आम्हां मोक्षाचा कंटाळा ।
कां तुम्ही गोपाळा नेणां ऐसें ॥३॥

अर्थ
आहो देवा तुमच्या चरणाचे सुख काय सांगावे?कारण तुम्हाला त्या चरण सुखाचा अनुभव नाही.आम्ही तुला ते सांगितले तर तुला ते खरे वाटणार नाही कसे वाटेल कारण अमृताचे गुण अमृताला कळत नाही.त्या सुखाची ग्वाही फक्त आम्ही माया लेकरे जाणतो माता लक्ष्मी व आम्ही तिचे मुले आहोत ते सुख आम्ही दोघेच जाणतो.तुकाराम महाराज म्हणतात हे गोपाळा आहो आम्हाला मोक्षाचा कंटाळा आहे हे तुम्ही का जाणत नाहीत.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


काय सांगों तुझ्या चरणीच्या – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.