हिरा ठेवितां ऐरणीं ।
वांचे मारितां जो घणीं ॥१॥
तोचि मोल पावे खरा ।
करणीचा होय चुरा ॥ध्रु.॥
मोहरा तोचि अंगें ।
सूत न जळे ज्याचे संगें ॥२॥
तुका म्हणे तोचि संत ।
सोसी जगाचे आघात ॥३॥
अर्थ
खरा हीरा ऐरणीवर ठेऊन वरुण घन मारला तरी फुटत नाही .त्याच हिर्याला खरे मूल्य असते चुरा होतो तो कृत्रिम होय .ज्याच्या संगतित सूत जळत नाही, तोच खरा मोहरा होय .तुकाराम महाराज म्हणतात, संत ही तसेच असते, जे जगाचे आघात सहन करत असतात.
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.