कुमुदिनी काय जाणे तो – संत तुकाराम अभंग – 249
कुमुदिनी काय जाणे तो परिमळ ।
भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥
तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम ।
आम्हीच तें प्रेमसुख जाणों ॥ध्रु.॥
माते तृण बाळा दुधाची ते गोडी ।
ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥२॥
तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं ।
नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥३॥
अर्थ
कमळ(कुमुदिनी)ला स्वतःचा परीमळ(सुगंध)समजतो काय पण भ्रमर(भुंगा)च त्याचे सुख भोगतो.अरे विठ्ठला तसेच तुझे नाम आहे ते किती गोड आहे ते तुला ठाऊक नाही पण त्या नामाचे भोग गोडी प्रेम सुख आम्ही जाणतो.गाय तृण(गवत)खाते आणि त्या गवताचे जे दुध तयार होते त्याची गोडी हि वासारालाच माहित आहे.पण ज्याची कमाई त्याच्या कामास येत नाही.तुकाराम महाराज म्हणतात शिंपल्याच्या पोटात मोती जन्माला येतो पण ते का एकदा बाहेर आले परत त्या शिपंल्याला मोतीची भेट त्या मोतीचा आंनद मिळत नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
कुमुदिनी काय जाणे तो – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.