न लगे हें मज तुझें ब्रम्हज्ञान – संत तुकाराम अभंग – 248
न लगे हें मज तुझें ब्रम्हज्ञान ।
गोजिरें सगुण रूप पुरे ॥१॥
लागला उशीर पतितपावना ।
विसरोनि वचना गेलासि या ॥ध्रु.॥
जाळोनि संसार बैसलों अंगणीं ।
तुझे नाहीं मनीं मानसीं हें ॥२॥
तुका म्हणे नको रागेजु विठ्ठला ।
उठीं देई मला भेटी आतां ॥३॥
अर्थ
देवा मला तुझे ब्रम्ह ज्ञान नको तुझे गोजिरे सगुण रूपच मला पुरे आहे.अरे देवा मला भेट देण्या करीता तू उशीर केला म्हणजे मी पतित पावन आहे या वचनाला तू विसरला आहे.अरे मी संसार जाळून अंगणात बसलो आहे.तुकाराम महाराज म्हणतात अरे विठ्ठला तू असा माझ्या वर रागावू नकोस उठ आता तू मला लवकर भेट दे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
न लगे हें मज तुझें ब्रम्हज्ञान – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.