आम्ही मागों ऐसें नाहीं – संत तुकाराम अभंग – 247

आम्ही मागों ऐसें नाहीं – संत तुकाराम अभंग – 247


आम्ही मागों ऐसें नाहीं तुजपाशीं ।
जरीं तूं भितोसि पांडुरंगा ॥१॥
पाहें विचारूनि आहे तुज ठावें ।
आम्ही धालों नावें तुझ्या एका ॥ध्रु.॥
ॠद्धिसिद्धि तुझें मुख्य भांडवल ।
हें तों आम्हां फोल भक्तीपुढें ॥२॥
तुका म्हणे जाऊं वैकुंठा चालत ।
बैसोनि निवांत सुख भोगूं ॥३॥

अर्थ
हे पांडुरंगा आम्ही जे काही मागत आहे ते तुझ्या पाशी नाही म्हणून तू आमच्याशी बोलण्यास भीत आहे.देवा तू विचार करून पहा हे तुला पण माहित आहे आम्ही तुझ्या नामानेच तृप्त झालो आहोत.देवा तुझ्या भक्ताला देण्यासाठी तुझ्याकडे रिद्धी सिद्धी हे एवढेच मुख्य भांडवल आहे पण ते आम्हास तुझ्या भक्ती पुढे निष्काम फोल वाटते.तुकाराम महाराज म्हणतात अरे आम्ही चालत वैकुंठाला जाऊ आणि निवांत सुख भोगू.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


आम्ही मागों ऐसें नाहीं – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.