उचित तें काय जाणावें दुर्बळें ।
थोरिवेचें काळें तोंड देवा ॥१॥
देतों हाका कोणी नाइकती द्वारीं ।
ओस कोणी घरीं नाहीं ऐसें ॥ध्रु.॥
आलिया अतीता शब्दे समाधान ।
करितां वचन कायवेंचे ॥२॥
तुका म्हणे तुम्हां साजे हें श्रीहरी ।
आम्ही निलाजिरीं नाहीं ऐसीं ॥३॥
अर्थ
परमार्थात उचित काय आहे हे मी दुबळा काय जाणार?पण ऐवढे मात्र मी जाणतो जो कोणी परमार्थात गर्व करतो त्याचे तोड काळे होते.जसे एखाद्या घरी कोणी नसते व आपण द्वारातून ओ दिली कि कोणीही ऐकत नाही तसे मी तुम्हाला हाक देऊनही तुम्ही काहीच बोलत नाही.आहो देवा आहो दारात आलेल्या पाहुण्याचे गोड शब्दाने समाधान केले तर काय खर्च आहे काय.तुकाराम महाराज म्हणतात आहो देवा तुमच्या थोर पणाच्या मानाने ते तुम्हाला साजेसे आहे ते तुम्हाला शोभातेही पण आम्ही पण एवढे निलाजिरी नाहीत.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.