कां हो देवा कांहीं न बोलाचि गोष्टी ।
कां मज हिंपुटी करीतसा ॥१॥
कंठीं प्राण पाहें वचनाची वास ।
तों दिसे उदास धरिलें ऐसें ॥ध्रु.॥
येणें काळें बुंथी घेतलीसे खोळ ।
कां नये विटाळ होऊं माझा ॥२॥
लाज वाटे मज म्हणवितां देवाचा ।
न पुससी फुकाचा तुका म्हणे ॥३॥
अर्थ
हे देवा तुम्हीं माझ्याशी काही का बोलत नाही का मला हिंपुटी म्हणजे कष्टी करता.माझा प्राण कंठात आला आहे तुझ्या शब्दाचा वसा व्हावा असे मला वाटते पण तुम्ही माझ्या भक्तीत उदासीन झाला आहात असे मला वाटते.आहो देवा तुम्ही खोळ पांघरून अलग वेगळे बसला आहात काय?माझा विटाळ तुम्हाला होऊ नये असे तुम्हाला वाटते काय?तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तुमचा म्हणण्याची लाज वाटते कारण तुम्ही मला फुकटचेही विचारत नाही?
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.