कोण पर्वकाळ पहासील – संत तुकाराम अभंग – 244

कोण पर्वकाळ पहासील – संत तुकाराम अभंग – 244


कोण पर्वकाळ पहासील तीथ ।
होतें माझें चित्त कासावीस ॥१॥
पाठवीं भातुकें प्रेरीं झडकरी ।
नको राखों उरी पांडुरंगा ॥ध्रु.॥
न धरावा कोप मजवरी कांहीं ।
अवगुणी अन्यायी म्हणोनियां ॥२॥
काय रडवीसी नेणतियां पोरां ।
जाणतियां थोरां याचिपरी ॥३॥
काय उभी कर ठेवुनियां कटीं ।
बुझावीं धाकुटीं लडिवाळें ॥४॥
तुका म्हणे आतां पदरासी पिळा ।
घालीन निराळा नव्हे मग ॥५॥

अर्थ
हे देवा अरे मला भेटण्यासाठी तू कोणत्या तिथीची पर्वकाळाची वाट पाहत आहे इकडे माझा जीव कासावीस होत आहे.अरे पांडुरंगा लवकर ये उशीर लावू नकोस.देवा मी अवगुणी अन्यायी आहे म्हणून तू माझ्यावर कोप करू नको माझा त्याग करू नको.अरे अज्ञानी मुलाला काय रडवतो?तू सर्व जाणता असून तू थोर आहे तरी असे का वागतो हे मला समजेना.अरे कर कटेवर ठेऊन काय उभा आहेस?आम्हा लहान लाडाची मुलांची तू समजूत काढ.तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही तूझ्या पदारालाच पीळ घालणार मग मी तुझ्या पेक्षा निराळाच नाही होणार?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


कोण पर्वकाळ पहासील – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.