पढियंतें आम्ही तुजपाशीं मागावें ।
जीवींचें सांगावें हितगुज ॥१॥
पाळसील लळे दीन वो वत्सले ।
विठ्ठले कृपाळे जननिये ॥ध्रु.॥
जीव भाव तुझ्या ठेवियेला पायीं ।
तूंचि सर्वा ठायीं एक आम्हां ॥२॥
दुजियाचा संग लागों नेदी वारा ।
नाहीं जात घरा आणिकांच्या ॥३॥
सर्वसत्ता एकी आहे तुजपाशीं ।
ठावें आहे देसी मागेन तें ॥४॥
म्हणउनि पुढें मांडियेली आळी ।
थिंकोनियां चोळी डोळे तुका ॥५॥
अर्थ
हे पांडुरंग आम्हाला जे आवडते ते आम्ही तुझ्या पाशी मागू व आमचे जीवाचे जे हित गुज आहे ते आम्हीं तुला सांगू.हे विठ्ठला तू आमचा सांभाळ आवडीने लाडाने व वात्सल्य भावनेने करशील.हे दिन वत्सला विठ्ठला तू या जगाची कृपाळू जननी आहेस.आम्हीं आमचा जीव भाव सर्व तुझ्या पायी ठेवला आहे सर्व ठिकाणी तूच आम्हला तारणारा आहे.आम्हांला दुसर्याच्या संगतीचा वाराही लागू देऊ नकोस आणि मी अणिकांच्या घरी सुद्धा जाता नाही.अरे पांडुरंगा मी जे काही मागेन ते तू मला नक्की देणार कारण सर्व सत्ता तुझ्या पाशी आहे हे मला माहित आहे.तुकाराम महाराज म्हणतात आणि म्हणूनच तर देवा मी तुझ्या पुढे आळी(हट्ट)मांडला आहे आणि डोळे चोळीत तुझ्या पुढे रडत आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.