तुजविण मज कोण वो – संत तुकाराम अभंग – 242

तुजविण मज कोण वो – संत तुकाराम अभंग – 242


तुजविण मज कोण वो सोयरें ।
आणीक दुसरें पांडुरंगे ॥१॥
लागलीसे आस पाहातसे वास ।
रात्री वो दिवस लेखीं बोटी ॥२॥
काम गोड मज न लगे हो धंदा ।
तुका म्हणे सदा हेचि ध्यान ॥३॥

अर्थ
हे पांडुरंगा तुझ्या वाचून मला या जगामध्ये दुसरे कोण सोयरे आहे.देवा तुझी मी अहोरात्र तुझी वाट पाहत आहे मला तुझ्या भक्तीची आस लागली आहे रात्र गेली दिवस गेला कि मी बोटाने मोजत आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझे कामात गोडी लागत नाही धंद्यात लक्ष लागत नाही सदा सर्वकाळ तुझेच ध्यान लागले आहे..


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


तुजविण मज कोण वो – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.