भक्तिप्रतिपाळे दीन वो वत्सले ।
विठ्ठले कृपाळे होसी माये ॥१॥
पडिला विसर माझा काय गुणें ।
कपाळ हें उणें काय करूं ॥२॥
तुका म्हणे माझें जाळूनि संचित ।
करीं वो उचित भेट देई ॥३॥
अर्थ
भक्ती प्रतिपाळे म्हणजे भक्तांचे रक्षण करणारी विठाबाई तू कृपाळू माऊली आहेस.हे विठ्ठला तुला माझा विसर तरी कसा पडला?अरे माझे कपाळच फुटके त्याला मी तरी काय करू?तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तू माझे संचित जाळूण तू मला भेट दे हे उचित कर्म तू कर हि माझी विनंती तुझ्या पाशी आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.