पराविया नारी रखुमाईसमान ।
हें गेलें नेमून ठायींचेंचि ॥१॥
जाई वो तूं माते न करीं सायास ।
आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ॥ध्रु.॥
न साहावें मज तुझें हें पतन ।
नको हें वचन दुष्ट वदों ॥२॥
तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार ।
तरी काय नर थोडे झाले ॥३॥
अर्थ
परनारी हि रखुमाई समान मानल्याने काही वाईट आहे काय?एका बाईला उद्देशून महाराज म्हणतात कि हे माते तू येथून जा आम्ही विष्णु दास आहोत आम्ही तुला जसे वाटतो आहोत आम्ही तसे नाही.तुझे हे चाललेले पतन मला सहन होत नाही तू दुष्ट वचन वदत जाऊ नकोस.तुकाराम महाराज म्हणतात अरे तुला पती पाहिजेच असेल तर या जगात पुरुष भरपुर आहेत.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.