जन विजन जालें आम्हां – संत तुकाराम अभंग – 24
जन विजन जालें आम्हां ।
विठ्ठलनामा प्रमाणें ॥१॥
पाहें तिकडे बापमाय ।
विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु.॥
वन पट्टण एकभाव ।
अवघा ठाव सरता जाला ॥२॥
आठव नाहीं सुखदुःखा ।
नाचे तुका कौतुकें ॥३॥
अर्थ
भक्तीचेप्रेम प्राप्त झाल्यामुळे जन आणि अरण्य आम्हाला समान भासते .जिकडे पहावे तिकडे आम्हाला विठ्ठल-रखमाईच दिसते .जनात आणि वनात आम्हाला काहीच फरक जाणवत नाही; कारण माझे मन देहावर नाही सर्वत्र माझी समदृष्टी झाली आहे .तुकाराम महाराज म्हणतात मी विठ्ठलाच्या नामसंकीर्तनामधे तन्मय झालो त्यामुळे मला सूखदुःखाची आठवनहि राहत नाही .
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
जन विजन जालें आम्हां – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.