मृत्युलोकीं आम्हां आवडती परी – संत तुकाराम अभंग – 238

मृत्युलोकीं आम्हां आवडती परी – सं तुकाराम अभंग – 238


मृत्युलोकीं आम्हां आवडती परी ।
नाहीं एका हरीनामें विण ॥१॥
विटलें हें चित्त प्रपंचापासूनि ।
वमन तें मनीं बैसलेंसे ॥ध्रु.॥
सोनें रूपें आम्हां मृत्तिके समान ।
माणिकें पाषाण खडे जैसे ॥२॥
तुका म्हणे तैशा दिसतील नारी ।
रिसाचियापरी आम्हांपुढें ॥३॥

अर्थ
हे मृत्यु लोक आम्हाला आवडते पण या मृत्यु लोकात हरी नामावाचुंन दुसरे काहीही आम्हाला आवडत नाही.आता आमचे चित्त प्रपंचा पासून विटले(ओकलेल्या अन्ना प्रमाणे)आहे मणि फक्त हरिनाम आहे.सोने रुपे आम्हाला माती प्रमाने तर माणिक हीरे आम्हाला हे दगडा प्रमाणे आहेत.तुकाराम महाराज म्हणतात ज्या सुंदर नारी आहेत त्या आम्हला अस्वाला प्रमाणे दिसतात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


मृत्युलोकीं आम्हां आवडती परी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.