बळियाचे अंकित – संत तुकाराम अभंग – 237

बळियाचे अंकित – संत तुकाराम अभंग – 237


बळियाचे अंकित ।
आम्ही झालों बळिवंत ॥१॥
लाताळीता संसारा ।
केला षड ऊर्मीचा मारा ॥ध्रु.॥
जन धन तन ।
केलें तृणाही समान ॥२॥
तुका म्हणे आतां ।
आम्ही मुक्तीचिया माथां ॥३॥

अर्थ
सर्व जगात जो स्वामी बळीवंत आहे त्याचे आम्ही अंकित झालो त्यामुळे आम्हीही बळीवंत झालो आहोत.त्यामुळे आम्ही या संसाराला लाथ मारून सहा उर्मींचा नाश केला आहे.जन धन व तन या सर्वांना आम्ही तृण म्हणजे कसपटा समान मानले आहे.तुकाराम महाराज म्हणतात आता तर आम्ही मुक्तीच्याही माथ्यावर बसलो आहोत.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


बळियाचे अंकित – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.