आम्ही वैकुंठवासी – संत तुकाराम अभंग – 236

आम्ही वैकुंठवासी – संत तुकाराम अभंग – 236


आम्ही वैकुंठवासी ।
आलों याचि कारणासी ।
बोलिले जे ॠषी ।
साच भावें वर्ताया ॥१॥
झाडूं संतांचे मारग ।
आडरानें भरलें जग ।
उच्छिष्टाचा भाग ।
शेष उरलें तें सेवूं ॥ध्रु.॥
अर्थे लोपलीं पुराणें ।
नाश केला शब्दज्ञानें ।
विषयलोभी मन ।
साधन हे बुडविलीं ॥२॥
पिटूं भक्तिचा डांगोरा ।
कळिकाळासी दरारा ।
तुका म्हणे करा ।
जय जयकार आनंदें ॥३॥

अर्थ
आहो आम्हीं वैकुंठाचे वासी आहोत परंतु आम्हीं या भूतलावर पुराणातीला ऋषी मुनींनी जे वचन सांगितलेले आहेत भक्ती आचरण कसे करावे त्याचे प्रत्येक्ष अचारण करून दाखविणे यासाठी आलो आहोत.संतांचे मार्ग आम्हीं झाडू अज्ञानरूपी जे जंगल आहे आम्हीं ते साफ करू संतांचे उच्छिष्ट जे राहील ते आम्हीं अतिशय आदराने सेवन ग्रहण करू.पुराणात जे अर्थे सांगितले आहेत त्याचा या शब्द ज्ञानी लोकांनी नाश केला आहे विषय लोभी झालेले माणसांनी पारमार्थिक साधने नष्ट केली आहेत.तुकाराम महाराज म्हणतात आम्हीं भक्तीचा डांगोरा पिटू व त्यामुळे काळी काळास हि दरारा सुटतो व या कारण मुळे च हरी नामाचा आंनदाने जयजय कर करा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


आम्ही वैकुंठवासी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.