कास घालोनी बळकट – संत तुकाराम अभंग – 235
कास घालोनी बळकट ।
झालों कळिकाळावरी नीट ।
केली पायवाट ।
भवसिंधूवरूनि ॥१॥
या रे या रे लाहान थोर ।
याति भलते नारीनर ।
करावा विचार ।
न लगे चिंता कोणासी ॥ध्रु.॥
कामी गुंतले रिकामे ।
जपी तपी येथें जमे ।
लाविले दमामे ।
मुक्ता आणि मुमुक्षा ॥२॥
एकंदर शिक्का ।
पाठविला इहलोका ।
आलों म्हणे तुका ।
मी नामाचा धारक ॥३॥
अर्थ
मी कास बळकट करून काळीकाळाशीही लढण्या करिता पाय वाट बळकट केले आहे मी.आहो लहान मोठे भलत्या जातीचे पुरुष स्त्रिया या हो या येथे कोणाचाही विचार करायला नको.आहो येथे कामात गुंतलेले जपी तपी मुक्त झालेले मोक्षाची वाट पाहणारे सगळे या सर्वांना समजण्या साठी दमामे नौबती लावले आहेत.तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाचा शिक्का या इहलोक मध्ये सरसकट पाठविला आहे आणि हेच सांगण्यासाठी मी नामाचा धारक येथे आलो आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
कास घालोनी बळकट – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.