कृष्ण माझी माता कृष्ण – संत तुकाराम अभंग – 233

कृष्ण माझी माता कृष्ण – संत तुकाराम अभंग – 233


कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता ।
बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥
कृष्ण माझा गुरू कृष्ण माझें तारूं ।
उतरी पैल पारू भवनदीचा ॥ध्रु.॥
कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन ।
सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥२॥
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा ।
वाटे न करावा परता जीवा ॥३॥

अर्थ
कृष्ण माझी माता पिता बहिण बंधू चुलता आहे.कृष्ण माझा गुरु तारू आणि भाव नदीच्या पलीकडे नेणारी नौका कृष्णच आहे.कृष्ण माझे मन आहे कृष्ण माझे जन आहे कृष्ण माझा सोईरा सज्जन आहे.तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण माझा विसावा म्हणजे विश्रांतीचे ठिकाण आहे व याला माझ्या पासून वेगळे करावे असे मला वाटत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


कृष्ण माझी माता कृष्ण – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.