दिली हाक मनें नव्हे ती – संत तुकाराम अभंग – 232

दिली हाक मनें नव्हे ती – संत तुकाराम अभंग – 232


दिली हाक मनें नव्हे ती जतन ।
वेगाळले गुणें धांव घेती ॥१॥
काम क्रोध मद मत्सर अहंकार ।
निंदा हिंसा फार माया तृष्णा ॥ध्रु.॥
इंद्रियांचे भार फिरतील चोर ।
खाणे घ्यावया घर फोडूं पाहे ॥२॥
माझा येथें कांहीं न चले पराक्रम ।
आहे त्याचें वर्म तुझे हातीं ॥३॥
तुका म्हणे आतां करितों उपाय ।
जेणें तुझे पाय आतुडती ॥४॥

अर्थ
देवा तुला हाक देण्याचे कारण म्हणजे मनाने हरी चिंतन हरी जतन होत नाही मन ज्या गुणाने भरलेले आहे वृत्ती त्याच दिशेने धावा घेते.हे देवा माझ्या मना मध्ये काम क्रोध मद मत्सर अहंकार निंदा हिंसा माया तृष्ण फार बळावले आहेत.इंद्रिय रुपी चोर हे देह रूपातील घर फोडू पाहत आहे व जे काही परमार्थरूप धन येथे आहे ते धन चोरून नेण्यास हे चोर फिरत आहे.हे देवा या ठिकाणी माझे काहीही पराक्रम चालत नाही याचे वर्म तुझ्या हातात आहे हे मला माहित आहे.तुकाराम महाराज म्हणतात आता मी तोच उपाय करणार आहे जेणे तुझे या पायाचे दर्शन घडेल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


दिली हाक मनें नव्हे ती – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.