निवडे जेवण सेवटींच्या घांसें – संत तुकाराम अभंग – 231
निवडे जेवण सेवटींच्या घांसें ।
होय त्याच्या ऐसें सकळ ही ॥१॥
न पाहिजे झाला बुद्धीचा पालट ।
केली खटपट जाय वांयां ॥ध्रु.॥
संपादिलें व्हावे धरिलें तें सोंग ।
विटंबणा व्यंग पडियाली ॥२॥
तुका म्हणे वर्म नेणतां जें रांधी ।
पाववी ते बुद्धी अवकळा ॥३॥
अर्थ
एखाद्या गोष्टीचे मर्म जाणणे किती अवश्यक आहे हे सांगण्या साठी महाराज म्हणतात संपूर्ण जेवण झाले आणि शेवटचा घास जर गोड लागला तर जेवण चांगले लागते.आपली सद्बुद्धी हिचा पालट कधीही होऊ देवू नये कारण असे झाल्यास सर्व खटपट व्यर्थ ठरते.जे सत्कार्य हाती घेतले ते सत्कार्य पूर्ण पणे तडीस नेले पाहिजे नाही तर फजिती होते.तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याला जर स्वयंपाक येत नसेल आणि त्याने जर स्वयंपाक करण्याचा शहाण पण केला तर त्याची शेवटी फजित होते त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे मर्म हे माहित पाहिजे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
निवडे जेवण सेवटींच्या घांसें – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.