यासी कोणी म्हणे निंदेचीं – संत तुकाराम अभंग – 230
यासी कोणी म्हणे निंदेचीं उत्तरें ।
नागवला खरें तोचि एक ॥१॥
आड वाटे जातां लावी नीट सोई ।
धर्मनीत ते ही ऐसी आहे ॥ध्रु.॥
नाइकता सुखें करावें ताडण ।
पाप नाहीं पुण्य असे फार ॥२॥
जन्म व्याधि फार चुकतील दुःखें ।
खंडावा हा सुखें मान त्याचा ॥३॥
तुका म्हणे निंब दिधल्यावांचून ।
अंतरींचा शीण कैसा जाय ॥४॥
अर्थ
मी जे काही बोलणार आहे याला कोणी जर निंदेचे भाषण म्हंटले तर तो फसला जाईल.कोणी जर अधार्मा कडे जात असला त्याला निट सोईला लावणे हि धर्म नीती आहे.व आपण जर चांगले सांगत असतांना कोणी ऐकले नाही तर त्याच्याशी सुखाने भांडावे व त्याला मारही द्यावा यात कसलेही पाप नसून उलट आधी पुण्याच आहे जर आपण असे केले तर त्याची जन्म व्याधी व दुखे यातून खंडन होईल म्हणून त्याची मान खंडना सुखाने करावी.तुकाराम महाराज म्हणतात कडू लिंबासारखे कडू औषध असल्याशिवाय त्याचा ताप कसा जाईल दुर्जनालाही शिक्षा केल्याशिवाय तो कसा नीट होईल?
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
यासी कोणी म्हणे निंदेचीं – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.