निंदी कोणी मारी – संत तुकाराम अभंग – 23
निंदी कोणी मारी ।
वंदी कोणी पूजा करी ॥१॥
मज हें ही नाहीं तें ही नाहीं ।
वेगळा दोहीं पासुनी ॥ध्रु.॥
देहभोग भोगें घडे ।
जें जें जोडे तें बरें ॥२॥
अवघें पावे नारायणीं ।
जनार्दनीं तुकयांचें ॥३॥
अर्थ
या जगात आपली कुणी स्तुति करो वा निंदा करो, मला त्याचे काही सुखदुःख वाटत नाही .कारण निंदा व स्तुति या दोन्ही गोष्टीं पासून मी निराळा आहे .पूर्वसंचितानुसार या देहाला सुखदुःख प्राप्त होतात, ते देहभोग मी निमुटपने भोगतो.तुकाराम महाराज म्हणतात मी विठ्ठलरूप असल्यामुळे माझे देह भोग मी विट्ठलालाच अर्पण करीत आहे.
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
निंदी कोणी मारी – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.