मी दास तयाचा जया चाड – संत तुकाराम अभंग – 229

मी दास तयाचा जया चाड – संत तुकाराम अभंग – 229


मी दास तयाचा जया चाड नाहीं ।
सुख दुःख दोहाविरहित जो ॥१॥
राहिलासे उभा भिवरेच्या तीरीं ।
कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥
नवल काई तरी पाचारितां पावे ।
न त्वरित धांवे भक्तीकाजें ॥२॥
सर्व भार माझा त्यासी आहें चिंता ।
तोंचि माझा दाता स्वहिताचा ॥३॥
तुका म्हणे त्यास गाईन मी गीतीं ।
आणीक तें चित्तीं न धरीं कांहीं ॥४॥

अर्थ
मी त्याचा दास झालो आहे ज्याला कसलीही इच्छा नाही सुख व दुख या दोन्हींच्या पलीकडे आहे अशाचा मी दास झालो म्हणजे देवाचा.असा तो देव भिवरे च्या तीरी कमरेवर हात ठेऊन उभा आहे.आहो हा देव हाक मारली कि लगेच धावतो आणि भक्तांचे कार्य करण्या करिता तो त्वरेने येतो.माझा सर्व भार त्याच्या वर आहे व माझी सर्व चिंताही तोच करतो व तोच माझ्या स्वहिताचा विचार करणारा आहे.तुकाराम महाराज म्हणतात मी त्याच विठोबाचे गीत माझ्या मुखाने गाईन व त्या वाचून दुसरे काही चित्तात येऊ देणार नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


मी दास तयाचा जया चाड – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.