आमुचें उचित हेचि उपकार ।
आपलाचि भार घालूं तुज ॥१॥
भूक लागलिया भोजनाची आळी ।
पांघुरणें काळीं शीताचिये ॥ध्रु.॥
जेणें काळें उठी मनाची आवडी ।
तेचि मागों घडी आवडे तें ॥२॥
दुःख येऊं नेदी आमचिया घरा ।
चक्र करी फेरा भोंवताला ॥३॥
तुका म्हणे नाहीं मुक्तीसवें चाड ।
हेंचि आम्हां गोड जन्म घेतां ॥४॥
अर्थ
हे पांडुरंगा आम्हां भक्तांचे योग क्षेमाचा भार तुमच्यावर घालून स्वस्त बसावे एवढेच काम आमचे हेच तुझ्यावर उपकार आहेत. हे पांडुरंगा भूक लागली कि आम्ही तुलाच आळवणार व थंडी लागली कि आम्हीं पांघरून तुझ्या जवळच मागणार.आम्हाला मनाने ज्या वेळी जे आवडेल ते तुमच्या जवळ त्या वेळी आम्हीं तुला मोठ्या प्रेमाने मागु.तुझे सुदर्शन चक्र हे देवा आमच्या घरा मध्ये व मना मध्येही दुखला येऊ देत नाही.तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मुक्तीची चाढ नाही कारण सारखे सारखे जन्म घेऊन तुझ नाम घेणे त्यातच गोडी वाटते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.