माझें चित्त तुझे पायीं – संत तुकाराम अभंग – 227

माझें चित्त तुझे पायीं – संत तुकाराम अभंग – 227


माझें चित्त तुझे पायीं ।
राहें ऐसें करीं कांहीं ।
धरोनियां बाहीं ।
भव हा तारीं दातारा ॥१॥
चतुर तूं शिरोमणि ।
गुणलावण्याची खाणी ।
मुगुट सकळं मणि ।
धन्य तूंचि विठोबा ॥ध्रु.॥
करीं त्रिमिराचा नाश ।
उदयो होउनि प्रकाश ।
तोडीं आशापाश ।
करीं वास हृदयीं ॥२॥
पाहें गुंतलों नेणतां ।
माझी असो तुम्हां चिंता ।
तुका ठेवी माथा ।
पायीं आतां राखावें ॥३॥

अर्थ
हे दातारा दयाघना माझे चित्त तुझ्या पायी राहीन असा काही तरी उपाय कर आणि माझे बाही म्हणजे हात धरून हा भवसागर तार.हे नारायण तू चतुर शिरोमणी आहेस व लावण्याची खाण आहेस सर्वांचा मुकुट मनी आहेस हे विठोबा तू धन्य आहेस.तू सर्व तीमिरांचा म्हणजे माझ्या अज्ञान रुपी अंधकाराचा नाश कर व माझ्या हृदयातच प्रकट हो प्रकाशित हो व तेथील आशा पाश तोडून टाकून तू तेथेच म्हणजे माझ्या हृदयात वास कर.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी या प्रपंचात गुंतलो आहे तुम्हाला माझी काळजी घ्यावी लागेल मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो आहे तुम्ही मला तुमच्या चरणाशी आश्रय द्या.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


माझें चित्त तुझे पायीं – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.