ध्याइन तुझें रूप गाइन तुझें – संत तुकाराम अभंग – 226
ध्याइन तुझें रूप गाइन तुझें नाम ।
आन न करीं काम जिव्हामुखें ॥१॥
पाहिन तुझे पाय ठेविन तेथें मी डोई ।
पृथक तें कांही न करीं आन ॥ध्रु.॥
तुझेचि गुणवाद आइकेन कानीं ।
आणिकांची वाणी पुरे आतां ॥२॥
करिन सेवा करीं चालेन मी पायीं ।
आणीक न वजें ठायीं तुजविण ॥३॥
तुका म्हणे जीव ठेवीन मी पायी ।
आणीक ते काई देऊं कवणा ॥४॥
अर्थ
देवा मी तुझेच रूप ध्यानी ठेवीन तुझेच नाम गाईन आणि दुसरे कोणतेही काम माझी जीभ करणार नाही.हे देवा मी माझ्या डोळ्याने तुझेच पाय चरण पाहीन व माझे मस्तक त्या ठिकाणी ठेवीन त्याशिवाय दुसरे काही करणार नाही.तुझेच गुणगान मी गाईन व व्यर्थ बडबड पुरे आता.मी पायी चलत येऊन तुझीच सेवा करीन व तुला सोडून दुसरे कोठेही मी जाणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात मी माझा जीव तुझ्या पायी ठेवीन आणि आता कोणालाही काही देण्या साठी माझ्या कडे काय आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
ध्याइन तुझें रूप गाइन तुझें – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.