विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा ।
जाइन त्याच्या गांवा भेटावया ॥१॥
सीण भाग त्यासी सांगेन आपुला ।
तो माझा बापुला सर्व जाणे ॥ध्रु.॥
माय माउलिया बंधुवर्गा जना ।
भाकीन करुणा सकिळकांसी ॥२॥
संत महंत सिद्ध महानुभाव मुनि ।
जीवभाव जाऊनि सांगेन त्या ॥३॥
माझिये माहेरीं सुखा काय उणें ।
न लगे येणें जाणें तुका म्हणे ॥४॥
अर्थ
हा विठ्ठल माझा सोयरा सज्जन व विसावा आहे त्याला भेटण्यासाठी मी त्याच्या गावाला जाईन.माझा भाग शिण सर्व काही मी त्या विठोबाला सांगेन कारण तो माझा बापूला आहे तो माझा सर्व जानतो.त्या ठिकाणी माझी माया बहिण बंधू हे सर्व आहेत व मी त्या ठिकाणी जाऊन सर्वांसमोर माझी करून भाकीन सांगेन.तेथे संत महंत सिद्ध मुनी महानुभाव आहेत आणि त्यांना मी माझ्या जीव भाव चे सर्व गोष्टी सांगेन.तुकाराम महाराज म्हणतात अहो हे माझे माहेर आहे तेथे सुखाला काय उणे आहे तेथे गेलो कि माझ्या जन्म मृत्युच्या फेऱ्या चुकतात.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.