संत तुकाराम अभंग

तेणें सुखें माझें निवविलें – संत तुकाराम अभंग – 224

तेणें सुखें माझें निवविलें – संत तुकाराम अभंग – 224


तेणें सुखें माझें निवविलें अंग ।
विठ्ठल हें जग देखियेलें ॥१॥
कवतुकें करुणा भाकीतसें लाडें ।
आवडी बोबडें बोलोनियां ॥ध्रु.॥
मज नाहीं दशा अंतरीं दुःखाची ।
भावना भेदाची सर्व गेली ॥२॥
तुका म्हणे सुख झालें माझ्या जीवा ।
रंगलो केशवा तुझ्या रंगे ॥३॥

अर्थ
विठ्ठल रुपी जग पहिल्या नंतर व मी हि विठ्ठल रूप झाल्या नंतर मला अतिशय सुख झाले.मी या विठ्ठलाचे लाडाने आणि बोबड्या शब्दाने कवतुकाने करूणा करतो.आहो माझ्या अंतरंगात दुख:च राहिले नाही कारण माझी भावना समूळ गेली आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे केशवा माझ्या जीवाला अपार सुख झाले आहे कारण हरीच्या रंगात मी रंगलो आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


तेणें सुखें माझें निवविलें – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *