सिंदळीचे सोयरे चोराचीया – संत तुकाराम अभंग – 223

सिंदळीचे सोयरे चोराचीया – संत तुकाराम अभंग – 223


सिंदळीचे सोयरे चोराचीया दया ।
ते ही जाणा तया संवसर्गी ॥१॥
फुकासाठी भोगे दुःखाचा वाटा ।
उभारोनी कांटा वाटेवरी ॥ध्रु.॥
सर्प पोसूनियां दुधाचा नास ।
केलें थीता विष अमृताचें ॥२॥
तुका म्हणे यासी न करितां दंडण ।
पुढिल खंडण नव्हे दोषा ॥३॥

अर्थ
एखाद्या व्यभिचारिण स्त्रीचे नातेवाईक आप्तेष्ट आणि चोराला दया दाखविणार माणूस हे सारखेच.असे माणसे फुकटच्या साठी दुखाचाही वाटा भोगायला तयार होतात कारण हे माणसे चांगल्या वाटेवर काटे पसरविणाऱ्या माणसासारखे असतात.आहो सापाला जरी दुध पाजले तरी त्याचे विष होते.तुकाराम महाराज म्हणतात दुष्ट लोकांना दंड केले नाही तर त्यांच्या पापाचे खंडन होत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


सिंदळीचे सोयरे चोराचीया – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.