वाघाचा कलभूत दिसे वाघाऐसा ।
परी नाहीं दशा साच अंगीं ॥१॥
बाहेरील रंग निवडी कसोटी ।
संघष्टणें भेटी आपेआप ॥ध्रु.॥
सिकविलें तैसें नाचावें माकडें ।
न चले त्यापुढें युक्ति कांहीं ॥२॥
तुका म्हणे करी लटिक्याचा सांटा ।
फजित तो खोटा शीघ्र होय ॥३॥
अर्थ
वाघाचे नुसते कातडे घेऊन त्या मध्ये भुसा भरून उभे केले तर ते खरे वाटते पण वाघाच्या अंगी जे काही गुण असते ते त्या ठिकाणी नसते.मुलाम्यचे नाणे कसोटीला लावले म्हणजे त्याचा खरा रंग दिसतो म्हणजे एखाद्याचे जास्त संबंध झाले तर त्याचा स्वभाव लक्षात येतो.ज्या प्रमाणे माकडाला शिकविले तर त्याला तेवढेच नाचणे खेळ करणे तेवढेच त्याला येते पण त्या पुढे त्याला स्वतःच्या बुद्धीने काही जमत नाही.तुकाराम महाराज म्हणतात ज्यांनी खोट्याचा साठा केला आहे अश्यांची फजिती हि प्रसंगी होते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.