संतसमागम एखादिया परी ।
राहावें त्याचे द्वारीं श्वानयाती ॥१॥
तेथें रामनाम होईल श्रवण ।
घडेल भोजन उच्छिष्टाचें ॥ध्रु.॥
कामारी बटीक सेवेचे सेवक ।
दीनपण रंक तेथें भलें ॥२॥
तुका म्हणे सर्व सुख त्या संगती ।
घडेल पंगती संतांचिया ॥३॥
अर्थ
एखाद्या बरोबर राहून जर संतसहवास घडत असेल तर त्याच्या दारात इनामी कुत्र्याप्रामाने राहावे .जेथे राम नाम व संतवचन श्रवण करण्यास मिळेल येथील उष्टे भोजनहि करावे .अश्या संतांच्या घरी आपण सेवक बनून राहिलो असता आपले दैन्य निगुण जातील .तुकराम महाराज म्हणतात, संतांच्या सहवासात, पंगतित बसले असता जीवनातील सर्व सुखांचा लाभ होतो .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.