भले म्हणवितां संतांचे सेवक – संत तुकाराम अभंग – 220
भले म्हणवितां संतांचे सेवक ।
आइत्याची भीक सुखरूप ॥१॥
ठसावितां बहु लागती सायास ।
चुकल्या घडे नाश अल्प वर्म ॥ध्रु.॥
पाकसिद्धी लागे संचित आइतें ।
घडतां सोई तें तेव्हां गोड ॥२॥
तुका म्हणे बर्या सांगतांचि गोष्टी ।
रणभूमि दृष्टी न पडता ॥३॥
अर्थ
आपण जर स्वतःला संतांचेसेवक म्हणावले तर त्यांच्या ज्ञानाची, तपाची, संचिताची शिदोरि आपोआप आपल्याकडे चालत येते एखादी परमार्थिक गोष्ट पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात त्यात थोडी जरी चूक झाली तर नाश होतो .पाकशुद्धी करण्यासाठी सर्व पदार्थ व्यवस्तीत व प्रमाणात असावे लागतात, त्यातून जेवण रुजकर बनेले तरच ती पाकशुद्धी सफल होते .तुकाराम महाराज म्हणतात ,जो पर्यंत रणभूमी दिसत नाही तो पर्यंतच युद्धकथा गोड वाटतात .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
भले म्हणवितां संतांचे सेवक – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.