संत तुकाराम अभंग

देव सखा जरी – संत तुकाराम अभंग – 219

देव सखा जरी – संत तुकाराम अभंग – 219


देव सखा जरी ।
जग अवघें कृपा करी ॥१॥
ऐसा असोनि अनुभव ।
कासाविस होती जीव ॥ध्रु.॥
देवाची जतन ।
तया बाधूं न शके अग्न ॥२॥
तुका म्हणे हरी ।
प्रल्हादासी यत्न करी ॥३॥

अर्थ
देवा तू ज्यांचा सखा-सोयरा आहे, पाठिराखा आहे, त्यांच्यावर सर्व जग माया प्रेम करते .असा प्रत्यक्ष अनुभव येवून सुद्धा भगवंताची कृपा संपादन न करता काहींचा जिव संसारिक विषयांसाठी कासाविस होतो .ज्याचे रक्षण देव करतो, त्याला अग्निचेही भय नसते .तुकाराम महाराज म्हणतात, भक्त प्रल्हादा करता भगवंताने असेच् प्रयत्न केले होते .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


देव सखा जरी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *