करोत तपादि साधनें – संत तुकाराम अभंग – 218

करोत तपादि साधनें – संत तुकाराम अभंग – 218


करोत तपादि साधनें ।
कोणी साधो गोरांजनें ॥१॥
आम्ही न वजों तया वाटा ।
नाचूं पंढरीचोहटां ॥ध्रु.॥
पावोत आत्मिस्थिति ।
कोणी म्हणोत उत्तम मुक्ति ॥२॥
तुका म्हणे छंद ।
आम्हां हरीच्या दासां निंद्य ॥३॥

अर्थ
परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी कोणी तपच्यर्‍या करतो, तर कोणी देह अग्नीला अर्पण करतो .आम्ही मात्र त्या वाटेला जाणार नाही ; तर पंढरीच्या वाटेवर भक्तीने, श्रध्देने नाचत जाऊ .कोणाला आत्मस्थिति प्राप्त होवो अथवा कुणाला मुक्ती मिळो .तुकाराम महाराज म्हणतात, हरिच्या नामस्मरणाशिवाय इतर छंद आम्हाला (हरिदासांना) वर्ज आहेत .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


करोत तपादि साधनें – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.