वैष्णव तो जया – संत तुकाराम अभंग – 217
वैष्णव तो जया ।
अवघी देवावरी माया ॥१॥
नाहीं आणीक प्रमाण ।
तन धन तृण जन ॥ध्रु.॥
पडतां जड भारी ।
नेमा न टळे निर्धारीं ॥२॥
तुका म्हणे याती ।
हो का तयाची भलती ॥३॥
अर्थ
ज्याची पूर्ण श्रद्धा व प्रेम विठ्ठलावर (देवावर) आहे, इतर कोणत्याही वस्तुवर नाही, तोच खरा विष्णुभक्त होय .ज्याला तन, धन, जन हे विठ्ठलासमोर तृणासमान वाटतात, ज्याला केवळ एक भगवंत (विठ्ठल) देवच मान्य आहे कोणत्याही कठिण प्रसंगी जो आपली उपासना खंडित करत नाही, .तुकाराम महाराज म्हणतात, त्याची जात कोणतीही असो, तो वैष्णवच आहे .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
वैष्णव तो जया – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.